ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कादंबरीकार अरुण साधू यांचे आज (सोमवार) पहाटे चार वाजता निधन झाले. सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी देहदान केले असल्यामुळे अंत्यसंस्कार केले जाणार नाही. पत्रकारिता, साहित्यक्षेत्र, राजकीय वर्तुळ तसेच समाजाच्या सर्वच स्तरातून साधू यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पत्रकारिता व साहित्य या दोहोंमधलं भान सजगपणे जपणाऱ्या अरुण साधू यांच्या निधनाने एक पर्वच काळाच्या आड निघून गेलं आहे अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अरुण साधू यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केले आहे.
संयतपणे समाजमनाची चिकित्सा करणाऱ्या लेखक-पत्रकार अरुण साधू यांना भावपूर्ण आदरांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 25, 2017
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरूण साधू यांच्या निधनाने पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा पुरोगामी उदारमतवादी लेखक हरपला आहे, या शब्दात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
साधू यांच्या निधनामुळे मराठी साहित्य सृष्टीतील प्रसिद्ध साहित्यिक हरपला आहे. मराठी साहित्य सृष्टीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे असे विचार वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण मराठी साहित्य विश्वात अरुण साधू यांच्या निधनामुळे शोकांतिका पसरली आहे.
Very sad to know passing away of Noted Journalist and Writer #Arun Sadhu,his contribution will be remembered Condolences RIP
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) September 25, 2017
COMMENTS