बीड – गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून सरकारने सुरू केलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आदिवासी विकास मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीने घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची बाब समोर आली आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने तयार केली आहे. गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. मात्र याच खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठमध्ये तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.
आदिवासी विभागाने सुरू केलेल्या शिष्यवृत्ती योजनेत मंत्र्याची मुलगी लाभार्थी कशी होऊ शकते असा सवाल करीत मुंडे यांनी पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी बडोलेंवर कारवाई करावी अशी मागणी केली. एकीकडे गॅस वरील सबसिडी सोडण्यासाठी जनतेला आग्रह करणाऱ्या मोदी यांचेच मंत्री जर शासकीय योजनांचा लाभ घेणार असतील तर कोणाला अच्छे दिन आले असा सवाल त्यांनी केला आहे.
COMMENTS