आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. दरम्यान, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीच्या तरतुदींचा मोठ्याप्रमाणात समावेश करण्यात आला. तसेच काही कर देखील वाढवण्यात आले तर काही कर कमी करण्यात आल्याचे दिसत आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कोणते कर वाढेल आणि कोणते कर कमी झाले पाहूयात..
1. मूल्यवर्धितकर सवलत : शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देता यावा याकरीता सन 2016-17 चा ऊस खरेदी कर माफ. सन 2015-16 च्या ऊस खरेदी करमाफीसाठीची साखर निर्यात अट काढण्यात आली. जीवनावश्यक वस्तू जसे तांदुळ, गहू, डाळी व त्यांचे पीठ तसेच हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धणे, मेथी, सुवा, पापड, ओला खजूर यांचेवरील करमाफी
# आमसुलास नव्याने करमाफी
# सोलापूरी चादर व टॉवेलवरील करमाफी सुरु ठेवणार
# शेततळयाकरीताचे जीओ मेमब्रेनवरील कर 6% वरुन 0%
# शेत जमिनीची उत्पादकता तपासण्याकरीता सॉईल टेस्टींग किटवरील विक्रीकराचा दर 13.5 % वरुन 0 %
# दुधातील भेसळ तपासण्याकरीता मिल्क टेस्टींग किटवरील विक्रीकराचा दर13.5 % वरुन 0 %
# रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम अंतर्गत शहरांच्या विमाम वाहतुकीस इंधनाचा कर दर 5 % वरुन 1%
# कॅशलेस व्यवहाराकरीता कार्ड स्वाईप मशीनवरील कर 13.5 % वरुन 0%
# गॅस व विद्युत दाहिनीवरील कराचा दर 13.5 % वरुन 0%
2. करवृध्दी
# देशी व विदेशी मद्यावरील कलाम विक्री किमतीवर मुल्यवर्धित कराचा दर 23.08 % वरुन 25.93 %
# साप्ताहिक लॉटरीवरील कर रु. 70,000 वरुन रुपये 1 लक्ष
3. उद्योगास कर सवलत
# मधुमका प्रक्रिया उद्योगावरील दिनांक 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2016 पर्यत विक्रीकर माफ
# कापड प्रक्रिया उद्योगावरील मुल्यवर्धित कर दिनांक 8 एप्रिल 2011 ते 30 एप्रिल 2012 या कालावधीकरिता माफ. अंदाजित 200 उद्योगांस फायदा
# यार्न सायझिंग व वार्पिंग उद्योगांवरील मुल्यवर्धित कर दिनांक 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2016 पर्यंत माफ. अंदाजित 300 उद्योगांस फायदा
COMMENTS