राज्यातला “हा” पक्ष होणार भाकपमध्ये विलीन !

राज्यातला “हा” पक्ष होणार भाकपमध्ये विलीन !

मुंबई – महाराष्ट्रातील लाल निशान हा पक्ष आता भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन होणार आहे. येत्या 18 तारखेला मुंबई हा विलीनिकरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी एका कार्यकर्ता मेळाव्याचं ही आयोजन करण्यात आलं आहे. मोकाट भांडवलशाही आणि उन्मत धर्मांदता याविरोधात एकजूट गरजेचीं असल्याचं सांगत हे विलिनीकरण करण्यात येणार आहे. भाकपचे सुधाकर रेड्डी, भालचंद्र कांगो यांच्या उपस्तितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

COMMENTS