शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी गुड न्यूज आहे. या आठवड्यात महाराष्ट्र बहुतेक भागात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात येत्या तीन- चार दिवस चांगला पाऊस असेल, तसच मराठवाडा पुढील तीन- चार दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
22 जुलै पर्यंत पाऊस राहील पण नंतर परत पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरीनी पावसाचे पाणी साठवणूक करावी नंतरच पेरणी करणे गरेजेचे आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र जळगांव, सातारा, नाशिक जिल्हात काही भागात अतिमुसळधार पाऊस असेल, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसच पश्चिम महाराष्ट्र बहुतेक भागत पाऊस या आठवड्यात अपेक्षित आहे असा अंदाज कुलाबा वेधशाळा यांनी वर्तविला आहे.
COMMENTS