राज्यातील 154 गावे तंटामुक्त, 11 गावांना विशेष शांतता पुरस्कार,  तुमचं गाव यामध्ये आहे का ते शोधा

राज्यातील 154 गावे तंटामुक्त, 11 गावांना विशेष शांतता पुरस्कार,  तुमचं गाव यामध्ये आहे का ते शोधा

  • यवतमाळ जिल्हयातील सर्वाधिक 34 गावे तंटामुक्त
  • नाशिक व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी 15 गावे तंटामुक्त
  • धुळे व जळगांव जिल्ह्यातील प्रत्येकी 13 गावे तंटामुक्त

 

मुंबई, : महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेतंर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. सन 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा नुकतीच करण्यात आली.

गावात तंटे होऊ नयेत तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी. सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची  समृध्दीकडे वाटचाल व्हावी. या उद्देशाने 15 ऑगस्ट, 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राज्यात सुरु करण्यात आली आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतंर्गत राज्यात आतापर्यंत 18 हजार 993  गावांना तंटामुक्त पुरस्कार देण्यात आला आहे. तर 1 हजार 298  गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात आला आहे.

नवव्या वर्षातील मोहिमेच्या अंमलबजावणी कार्यक्रमानुसार 15 ते 30 ऑगस्ट, 2016 या कालावधीत राज्यातील 154 ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेतंर्गत तंटामुक्त गाव समितीने, भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन गावात दाखल असलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्याची माहिती संकलित करुन, दाखल तंटे व नव्याने निर्माण झालेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची कार्यवाही केली आहे.

त्यानुसार या गावांना सन 2001 च्या जनगणनेप्रमाणे गावाच्या लोकसंख्येनुसार   पुरस्कारांची रक्कम मिळणार आहे. तर विशेष शांतता पुरस्कार मिळालेल्या गावांना पुरस्कार रकमेच्या 25 टक्के इतकी वाढीव रक्कम मिळणार आहे. यानुसार या मोहिमेमध्ये पात्र ठरलेल्या गावांना या तीन कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने नुकताच प्रसिध्द केला आहे.

विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरलेली गावे

– नाशिक जिल्हा – चिंचोली (ता. सिन्नर) अहमदनगर जिल्हा – गोगलगाव (ता. नेवासा), पेमगिरी (ता. संगमनेर), पुणे जिल्हा – नरसिंहपूर (ता. इंदापूर), उस्मानाबाद जिल्हा – तुरोरी व तलमोड (ता. उमरगा), महालिंगरायवाडी (ता. मुरुम), परभणी जिल्हा – आनंदवाडी (ता. पालम), वझुर (ता. गंगाखेड), यवतमाळ जिल्हा – वालतुर तांवडे व डोंगरगाव (ता. उमरखेड),

तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेली गावे

– पालघर जिल्हा – नांदगाव (ता. जव्हार), रत्नागिरी जिल्हा – कांगवई (ता. दापोली), सिंधुदूर्ग जिल्हा – कोचरा (ता. वेंगुर्ला), नाशिक जिल्हा – शिवडी, गाजरवाडी, शिवरे, चापडगाव (ता. निफाड), आघारखुर्द, कौळाने नी, वजीरखेडे, विराणे (ता. मालेगाव), साळसाणे, आसरखेडे, वाकी बु., वाकी खु., पाथरशंम्बे (ता. चांदवड), वडगाव बल्लेगाव (ता. येवला), अहमदनगर जिल्हा – चिंचोली (ता. राहुरी), शिरसगाव (ता. श्रीरामपूर), जळगाव जिल्हा – भोणे, गारखेडा, कवठळ (ता. धरणगाव), मस्कावद खु., वाघाडी (ता. रावेर), पोहरे, भवाळी, आडगाव, मेहुणबारे (ता. चाळीसगाव), बिडगा/कुंड्यापाणी, गलवाडे, विरवाडे (ता. चोपडा), आडगाव (ता. एरंडोल), धुळे जिल्हा- छाईल, बुरडखे/पाचमोडी/ पिंजारवाडी/ सांबरसोंडा, टेंभे (वार्सा), दापुरा, गरताड, कंढरे आगारपाडा, छावडी आमोद, खुडाणे, ऐचाळे (ता. साक्री), मैलाणे कामपुर (ता. शिंदखेडा), कापडणे, बुरझड (ता. धुळे), कोल्हापूर जिल्हा – मळगे बू. मादयाळ (ता. कागल), नेसरी (ता. गडहिंग्लज), सोलापूर जिल्हा – खंडाळी (ता. माळशिरस), राळेरास (ता. बार्शी), औरंगाबाद जिल्हा-मंगरुळ, सांजखेडा, टाकळीमाळी/ एकलहरा/ महमदपूर/मलकापूर/हुसेनपूर (ता. औरंगाबाद), किनगाव, वारेगाव (ता. फुलंब्री), घोडेगाव, भालगाव, वरझडी, फुलशिवरा (ता. गंगापूर), उस्मानाबाद जिल्हा – येडशी, चिलवडी, जहागीरदारवाडी, बामणीवाडी (ता. उस्मानाबाद), बोरगाव, फुलवाडी (ता. तुळजापूर), परभणी जिल्हा – धारासूर (ता. सोनपेठ), टाकळगव्हाण (ता. परभणी), हिंगोली जिल्हा – बोरखेडी (पी) (ता. सेनगाव), इंचा, लोहगाव, लिंबाळा सरहद, बोराळा (ता. हिंगोली), जवळा बु. (ता. बसमत), अमरावती जिल्हा – शिवर (ता. दर्यापूर), आसेगाव (ता. चांदुर बाजार), दाढीपेढी (ता. भातकुली), अकोला जिल्हा – समशेरपूर, बोरगाव नि., जितापूर (ता. मुर्तीजापूर), जांभवसु (ता. बार्शिटाकळी), गोरेगाव खु. (ता. अकोला), रिधोरा, मालवाडा, खंडाळा (ता. बाळापूर), भंडारज बु. (ता. पातुर), वाशिम जिल्हा – सावंगा जहां., कार्ली, किनखेडा (ता. वाशिम), रिठद, एखलासपुर (ता. रिसोड), हनवतखेडा, सोनाळा वाकापूर (ता. मालेगाव), जोगलदरी जुनापानी (द), इचोरी, कळंबाबोडखे, चिखलागड, फाळेगाव (ता. मंगरुळपीर), धानोरा घाडगे (बु), वरोळी, सावळी (ता. मानोरा), यवतमाळ जिल्हा – नांदेपेरा (ता.वणी), बुरांडा (खडकी), (ता. मारेगाव), बारड (ता. बाभूळगाव), मेंढला (ता. कळंब), चापडोह (ता. यवतमाळ), खरबी, वालतुर तांवडे, डोंगरगाव, टाकळी (ता. उमरखेड), सराटी, वरणा, जागजई, वाऱ्हा, सरई, निदा (ता. राळेगाव), पाटण बोरी, वागदा, पाथरी, आकोली खुर्द, बोरगाव (कडू), ताडउमरी, सुन्ना (ता. केळापुर), पेकर्डा, सायखेडा, रामगाव (हरु) (ता. दारव्हा), मानकापूर, नांझा, सातफळे (ता. कळंब), खडकी, चहांद, किन्ही जवादे, पिपळापुर (ता. राळेगाव), ब्राम्हणवाडा प., कोहळा (ता. नेर), नागपूर जिल्हा – लोहगड (ता. कळमेश्वर), रामपूरी (ता. सावनेर), कटटा (ता. रामटेक), वराडा (वाघोली) (ता. पारसिवनी), सरांडी (ता. भिवापूर), चंद्रपूर जिल्हा – उदापूर, चिखलगाव, सोनेगाव, बेटाळा, कन्हाळगाव (ता. ब्रम्हपूरी), सिंगडझरी (ता. सिंदेवाही).

COMMENTS