दूध खरेदी दरात प्रति लीटर तीन रुपयांनी वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. गाईच्या दुधाचा खरेदी दर 24 रुपयांवरुन 27 रुपये एवढा करण्यात आला असून, म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 33 रुपयांवरुन 36 रुपये एवढे करण्यात आला आहे.
पशु, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने या खरेदी दरातील वाढीला मान्यता दिला आहे. दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरात वाढ केली असली, तरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन दूध विक्री दरात वाढ केलेली नाही.
महादेव जानकर
दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे तीन रूपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ग्राहकांवर याचा काही बोजा पडणार नाही. तसे निर्देश सर्व दूधसंघांना देण्यात आले आहेत. जर दूधसंघांनी निर्देश पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले आहे. महागाई निर्देशांक जसा वाढेल तसे दुधाचे दर वर्षातून एकदा वाढेल. असे ही त्यांनी सांगितले.
COMMENTS