येत्या 19 तारखेला शिवसेनेने नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या शेतकरी मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीही हजेरी लावणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील मतभेद टोकाला गेले आहेत. संधी मिळेल तिथे उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत असतात. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दावरुनही शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यासाठी शिवसनेतर्फे शिवसंपर्क अभियान छेडण्यात आले आहे. दुसरीकडे राजू शेट्टी यांनीही शेतक-यांच्या प्रश्नावरुन आंदोलनाची हाक दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आता आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे.
शिवसेना आणि राजू शेट्टी यांच्या भाजप सरकारबरोबरचे मतभेद टोकाला गेले आहेत. राजू शेट्टी यांच्या सहकारी सदाभाऊ खोत सध्या राज्यमंत्री आहेत. मात्र त्यांनी सरकारच्या बाजुनं भूमिका घेतली आहे. त्यामुळं सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातला विसंवाद वाढला आहे. आतापर्यंत दोघांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचं आता थेट युद्धात रुपांतर झालं आहे. त्यामुळेचं सरकारविरोधातला लढा अधिक तीव्र करण्यासाठी दोन्ही नेते एकत्र येत आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत होती.
COMMENTS