मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री महिन्याच्या शेवटी अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाची गती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सेवानिवृत्तीचे वय वाढल्यास त्याचा कोणताही आर्थिक भार सरकारी तिजोरीवर पडणार नाही. राज्यात सुमारे पावणे दोन लाख कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिटायरमेंटचं वयोमान वाढवल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाचे कामकाज अधिक वेगवान होईल, असे मानले जात आहे.
COMMENTS