राज्य सरकारने तब्बल दीड हजार कोटी रुपयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार साधारणपणे 25 लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. राज्यातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी तूरखरेदी मानली जात आहे. किमान 5 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी केली जाणार आहे.
राज्यभरात यासाठी 286 ठिकाणी तूरखरेदी केंद्रेही उभारली जाणार आहेत. यंदा राज्यात तूर उत्पादन तिपटीने वाढले असले, तरी म्हणावा तसा दर न मिळाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र हे देशातला सर्वात मोठे तूर निर्मिती करणारे राज्य आहे. देशातील अर्धी तूरनिर्मिती महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत मिळून होते. 11.7 लाख टनापैकी 2.3 लाख टन तूर खरेदी आतापर्यंत करण्यात आली आहे. तूर खरेदीसाठी राज्य सरकारला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसाठी अनेक नेत्यांनी मागणी लावून धरली होती तसेच शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलनेदेखील केली होती.
COMMENTS