राज ठाकरे स्वतःच फुटबॉल आहे; नारायण राणे यांचे राज ठाकरेना जोरदार प्रतिउत्तर

राज ठाकरे स्वतःच फुटबॉल आहे; नारायण राणे यांचे राज ठाकरेना जोरदार प्रतिउत्तर

मुंबई –  ‘तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे आज जाहीर केले.
राणे यांचा फुटबॉल झालाय असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले, राज हे स्वतःच फुटबॉल आहेत. माझ्या घरात दोन आमदार आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षात एकूण आमदार एकच आहे. त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राज यांची खिल्ली उडवली आहे.

 

COMMENTS