नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय योग्य वेळी घेऊ – रावसाहेब दानवे

नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय योग्य वेळी घेऊ – रावसाहेब दानवे

पुणे – नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर करू असे सुचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, नारायण राणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्ली येथे माझ्या निवास्थानीच भेट घेतली होती. त्यावेळी महत्वाची राजकीय चर्चा झाली. त्यामुळे योग्य वेळी राणेंच्या पक्षप्रवेशासंबंधीचा निर्णय जाहीर केला जाईल. आंदोलन करणे, मोर्चे काढणे राजकीय पक्षांचे कामच असते. त्यामुळे सध्या राज्यात निघत असलेले मोर्चे हे सरकारविरोधी असंतोषाचे वातावरण आहे असे म्हणता येणार नाही, असेही दानवे म्हणाले.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने दानवे बुधवारी पुण्यात आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

 

COMMENTS