नागपूर – केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागपुरातील मनकापूर येथील कार्यक्रमातील हा फोटो आहे. या फोटोत आठवले यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर आहेत, या फोटोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत उभे असताना या फोटोत रामदास आठवले चक्क बसलेले दिसतात. काहींच्या मते ते झोपले होते. पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर हे व्यासपीठावर उभे आहेत. पण, आठवले मात्र या फोटोत बसलेलेच दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर भलतात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, मनकापुरात नीती आयोगाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाआधी मोदी कोराडीमधील पॉवर प्लान्टच्या अधिकाऱ्यांकडून तांत्रिक माहिती समजून घेत होते. तेव्हा पंतप्रधान मोदींसह उपस्थित सर्व मंत्र्यांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली होती. मात्र, रामदास आठवले आणि हंसराज अहिर या दोन केंद्रीय मंत्र्यांना बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याने ते पूर्णवेळ उभेच होते.
कोराडीत बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याच्या रागातून रामदास आठवले कार्यक्रम संपल्यानंतरही बसूनच होते. मात्र, दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, मनकापुरातील कार्यक्रमात रामदास आठवले व्यासपीठावर बसल्या बसल्याच झोपी गेले. त्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना उठवले.
(छायाचित्र सौजन्य – दैनिक भास्कर)
COMMENTS