रामनाथ कोविंद यांची निवडीमागे भाजपाचं दलित मतांच्या बेरजेचं राजकारण,  सामनातून टीकास्त्र

रामनाथ कोविंद यांची निवडीमागे भाजपाचं दलित मतांच्या बेरजेचं राजकारण,  सामनातून टीकास्त्र

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार रामनाथ कोविंद यांना  शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला असा तरी,  सामनातून पुन्हा भाजपला लक्ष्य करण्यात आलंय. राष्ट्रपतीपदाच्या आडून भाजप दलित मतांच्या बेरजेचं राजकारण करत असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. 

दलित ‘व्होट बँक’ भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील आणि  2019च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला भरघोस फायदा होईल, या बेरजेत श्री. कोविंद हे बसले असतील तर हे राजकारण देशाला आणखी कोणत्या खड्ड्यात ढकलणार, असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय.

COMMENTS