रामनाथ कोविंद यांच्या शपथविधी सोहळ्यात घडलेल्या घडामोडी

रामनाथ कोविंद यांच्या शपथविधी सोहळ्यात घडलेल्या घडामोडी

रामनाथ कोविंद हे आज भारताचे 14 वे राष्ट्रपती बनले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपती पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथ ग्रहण समारंभासाठी अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी व सरकारी अधिकारी उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.

रामनाथ कोविंद यांच्या शपथविधी सोहळ्यात घडलेल्या घडामोडी

# रामनाथ कोविंद यांनी भाषणात महात्मा गांधी, पटेल, आंबेडकर आणि दीन दयाल उपाध्याय यांच्या नावाचा उल्लेख केला.

# ‘महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत आणि उपाध्याय यांचा एकात्मता मानवता वाद साकार करायचे आहे.’  परंतू भाषणात पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले नाही.

# भाषण झाल्यानंतर सभागृहात ‘जय श्रीरामच्या’ घोषणा झाल्या.

#  राष्ट्रपती येण्यापूर्वी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून सर्व खासदार आणि निमंत्रीतांनी येऊन स्थान ग्रहण करणे आवश्यक असते. परंतू राष्ट्रपती रामनाथ कोविंद आल्यानंतर काही वेळेनंतर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आल्या. प्रतिभा पाटील यांना उशीर झाला. त्या अगोदर पहिल्या रांगेत शेवटच्या खुर्चीवर बसल्या होत्या. परंतू चार मिनिटांनंतर त्यांना पंतप्रधान मोदींच्या बाजूला बसविण्यात आले.

# ममता बॅनर्जी आल्या परंतू आपल्या खासदारांसोबत मागच्या सीटवर बसल्या.

#  केजरीवाल उपस्थित राहिले.

 

 

COMMENTS