राम मंदिराच्या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढा-  सर्वोच्च न्यायालय

राम मंदिराच्या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढा- सर्वोच्च न्यायालय

राम मंदीर बांधायचे की नाही याचा निर्णय न्यायालयाच्या बाहेर घेतल्यास चांगले राहील, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या भांडणाचा लवकरात लवकर निकाल लावण्यात यावा यासाठी भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी आग्रही होते, यावेळी या खटल्यावर 31 मार्चनंतर सुनावणी करण्याची सूचनाही न्यायालयाकडून करण्यात आली.

 

सुब्रमण्यम स्वामी यांना देण्यात आलेल्या सूचनापत्रात, अयोध्येचा मुद्दा हा भावनांशी जोडलेला असल्याने, दोन्ही पक्षांनी आपापसात चर्चा करुन यावर निर्णय घेणे हाच  उत्तम उपाय आहे, असे  सरन्यायाधीशांच्या त्रिसदस्यीय समितीने स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्षांना न्यायालयाबाहेर उपाय काढण्यासाठी  मदत करण्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

COMMENTS