राम मंदिर आंदोलनात सहभागी झाल्याचा अभिमान आहे -उमा भारती

राम मंदिर आंदोलनात सहभागी झाल्याचा अभिमान आहे -उमा भारती

अयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर, अयोध्येत राम मंदिर निर्माण होणारच, त्यासाठी जीव देण्यासह आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले.

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींविरोधात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवण्याचा आदेश दिला आहे. त्यावर उमा भारती यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

यावर बोलताना उमा भारती म्हणाल्या, बाबरी मशीद पाडण्यासाठी कट रचण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. मी त्या आंदोलनात सहभागी झाले होते, याचा मला अभिमान आहे, कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर होणारच. आयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर. बाबरी मशिदप्रकरणी आम्ही कोणताही कट रचला नव्हता. मात्र, न्यायालयाचे आभार मानतो आणि न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते आम्हाला मान्य आहेत.

दरम्यान, उमा भारती यांनी काँग्रेसवरही शरसंधान साधले, त्या म्हणाल्या, काँग्रेसला आमच्यावर आरोप करण्याचे कोणतेही नैतिक अधिकार नाहीत.

COMMENTS