अयोध्येत राममंदिर उभारण्यास मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा विरोध नाही. यावरून राजकारण करणारे कट्टरपंथी आणि गुंड लोकच राम मंदिर उभारू देत नाही, असा आरोप राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला. तसेच न्यायालयाकडून यावर तोडगा निघणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. झारखंड मधील देवघर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर वादावरून परस्पर समजोता व्हावा म्हणून सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे. त्यातच भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणावर परस्पर सहमतीने तोडगा काढला जावा. दोन्ही पक्षांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास न्यायालय मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी नोंदवले होते.
COMMENTS