रायगड हेलिकॉप्टर अपघातावेळी नेमकं काय झालं ?  मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती !

रायगड हेलिकॉप्टर अपघातावेळी नेमकं काय झालं ? मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती !

मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी आज विधान परिषदेत चर्चा झाली. हा प्रकार गंभीर असून राज्याच्या प्रमुखांशी असं होत असेल तर त्याहूनही गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी रायगडला नेमकं काय झालं त्याची माहिती सभागृहाला दिली. मुख्यमंत्री म्हणतात, “मी आणि विनोद तावडे रायगडला गेलो तेंव्हा पायलटने आम्ही उतरताना हेलिकॉप्टरचे पंखे सुरू ठेवले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी आलो तेंव्हाही त्याने आधीच हेलिकॉप्टर चालू करुन ठेवले होते. त्यानंतर ते हेलिकॉप्टर वर जाऊन पुन्हा खाली आपटलं. एवढ्या अनुभवी पायलटने असं काय केलं ते चौकशीतच पुढं येईल.” पायलटने केलेला हा प्रकार गंभीर होता असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

COMMENTS