रावसाहेब दानवेंच्या तोंडाला काळे फासणा-यास 50 हजार रुपयांचे बक्षीस – मनसे

रावसाहेब दानवेंच्या तोंडाला काळे फासणा-यास 50 हजार रुपयांचे बक्षीस – मनसे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर सर्वच स्तरातून हल्लाबोल करण्यात येत आहे. यात आता मनसेच्या महिला आघाडीनेही दानवेंवर टीका करत, ‘दानवेंच्या तोंडाला काळ फासणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल’, अशी घोषणा मनसेच्या महिला आघाडीने केली आहे.

‘शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करुन त्यांची निंदा करणाऱ्या सत्ता पिपासू व मुजोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल’, अशी घोषणा नवी मुंबईतील मनसेच्या महिला आघाडीने केली आहे. सत्ताधाऱ्यांना आलेला माज असून रावसाहेब दानवेंची तात्काळ प्रदेश अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. अन्यथा नवी मुंबईत रावसाहेब दानवेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही.’, असा इशाराही नवी मुंबई महिला सेना उपशहर अध्यक्ष आरती धुमाळ यांनी दिला आहे.

 

COMMENTS