मुंबई – भाजपाने राष्ट्रपती उमेदवार जाहीर केल्यानंतर आता विरोधकांच्या उमेदवार ठरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. राष्ट्रपती पदासाठी आज भाजपकडून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. आता युपीए आघाडीकडून राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी 22 जून रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.
22 जूनला सायंकाळी 4 वाजता, दिल्लीमध्ये बैठक होणार असून या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह युपीएचे घटक पक्ष सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला कुठल्या पद्धतीने सामोरे जायचे या संबधीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
COMMENTS