राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोडण्याची छगन भुजबळाची मागणी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोडण्याची छगन भुजबळाची मागणी

मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी द्यावी  अशी विनंती पीएमएलए कोर्टाला केली आहे. यावर कोर्टात सोमवारी पुढील सुनावणी आहे.

मात्र, ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी छगन भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम 44  नुसार अशा व्यक्तीला घटनेच्या 54 व्या कलमानुसार मिळणाऱ्या घटनात्मक अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नाही आहे. पीएमएलए कोर्ट एखाद्या कैद्याविषयी विशेष सुविधा देण्याचे आदेश देऊ शकत नाही, असा आदेश हायकोर्ट रिट याचिकेवरच देऊ शकते.

 

COMMENTS