राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीत रामनाथ कोविंद आघाडीवर आहेत. संसद भवनातील खोली क्रमांक 6 मध्ये ही मतमोजणी करण्यात येत आहे. सुरूवातील संसद सदस्यांची मते मोजली जात आहेत. त्यानंतर विविधी राज्यातली मते मोजली जाणार आहेत. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. एनडीएचे रामनाथ कोविंद आणि युपीएच्या मीराकुमार यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र सध्याच्या संख्याबळानुसार रामनाथ कोविंद यांचं पारडं जड मानलं जातंय. राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलैला मतदान झालं होतं.
COMMENTS