दिल्ली – ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मीराकुमार या यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील. यूपीएच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीराकुमार यांच्यात लढत होणार आहे. मीराकुमार या 5 वेळा लोकसभेच्या खासदार म्हणून निवडूण आल्या आहेत. तसचं त्या लोकसभेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडूण आल्या होत्या. यूपीएच्या बैठकीला 17 पक्षांचे नेते हजर होते. डाव्या पक्षांनी गोपाळकृष्ण गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र मीराकुमार यांच्या नावावर अखेर एकमत झालं. सर्व विरोधी पक्षांनी मीराकुमार यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली आहे. तर नितीशकुमार यांनी एनडीएला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा असं आवाहन लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे.
COMMENTS