मुंबई – मनापासून मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवतांच्या नावाचा पुनरुच्चार केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
मनपासून मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले आहे. शरद पवारांच्या बाबतीत बोलायचे तर ते नरेंद्र मोदींचे गुरु आहेत, असे स्वत: मोदींनी सांगितले. त्यांना पद्मविभूषण दिले. मला माहित नाही कोणाच्या मनात काय येईल. एकमेकांची मने जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
हिंदूराष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच लायक असतील का, ह्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, का नसावेत? इतर राज्यपाल निवडणूक पाहा. इतरत्र ठिकाणी आरएसएस कार्यकर्त्यांची नेमणूक करतो, मग देशाचे नेतृत्त्व त्यांनी करायला हरकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
COMMENTS