राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन शिवसेनेनं काल भाजपवर जोरदार टीका केली असली तरी पाठिंबा कोणाला द्यायचा याबाबत अजून निर्णय घेतलला नाही. भाजपनं दलित मतांच्या तुष्टीकरणासाठी दलित उमेदवार दिला आहे अशी टीका काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे पाठिंब्याबाबत शिवसेना काय निर्णय घेते याकडं सगळ्यांच लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मातोश्रीवर होत आहे. त्यामध्ये पाठिंब्याबाबत निर्णय होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली होती.
COMMENTS