राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलैला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलैला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलैला होणार आहे. निवडणूक आयोगाने आज याबाबत घोषणा केली आहे. या निवडणुकीचा निकाल 20 जुलैला लागणार असून 28 जून ही नामांकन भरण्याची शेवटची तारीख असून 1 जुलै पर्यंत अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे ही निवडणूक होणार असून निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आल्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या तयारीला वेग येणार आहे.

COMMENTS