राष्ट्रपती निवडणुकीसाठी छगन भुजबळ येणार तुरूंगाबाहेर

राष्ट्रपती निवडणुकीसाठी छगन भुजबळ येणार तुरूंगाबाहेर

मुंबई –  महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तब्बल पावणे दोन वर्षांनी तुरूंगाबाहेर येणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करण्यासाठी विधिमंडळात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात केली होती. भुजबळांच्या विनंती अर्जावर आज सुनावणी झाली, यावर पीएमएलए कोर्टाने भुजबळांना परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळांना राष्ट्रपती निवडणुकीत आता मतदान करता येणार आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया पदासाठी येत्या 17 जुलैला मतदान होणार आहे. आपण विधानसभेचे सदस्य असल्याने या राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, अशी मागणी भुजबळ यांनी पीएमएलए न्यायालयात केली. न्यायालयाने त्यावर सकारात्क विचार केला असून, भुजबळ यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी दिली आहे.

 

 

 

COMMENTS