अहमदनगर:  राष्ट्रवादीचे आमदार पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर: राष्ट्रवादीचे आमदार पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर –  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये भारनियमनविरोधात आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी आमदार जगताप यांना ताब्यात घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसने तीन दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर, महावितरण अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून भारनियमन बंद होईल असं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र महावितरणने काल संध्याकाळी भारनियमनचे नवीन वेळापत्रक जारी करत, भारनियमन चालूच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीने महावितरण कार्यालयात आंदोलन केले. महावितरणने जगताप यांना 14 तारखेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र आजही भारनियमन कायम असल्याने कार्यकर्त्यानी भारनियमनविरोधात आंदोलन केले. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

COMMENTS