अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा शहराध्यक्ष सर्फराज खान याला 2 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्तीमधील काही पैसे त्याने मागितले होते. तीन हजारांची लाच मागितली मात्र दोन हजारांवर सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिक एसीबीने सापळा रचून खानला अटक करण्यात आली. सर्फराज खान हा मिल्लत स्कूलचा अध्यक्ष आहे. त्याच्यासोबत एका शिक्षकालाही अटक करण्यात आली.
COMMENTS