इस्लामपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आज राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा बालेकिल्ला किल्ला आणि होमपिच असलेल्या इस्मामपुरमध्ये येणार आहेत. सध्यातरी स्वाभीमानी शेतकरी संघटनेत असलेले, मुख्यमंत्र्यांचे अत्यंत लाडके मंत्री आणि जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. खरतंर हा भाजपचा शेतकरी मेळावा आहे, पण कार्यक्रमाचं सर्व नियोजन सदाभाऊ खोत बघत आहेत. त्याचा अर्थ निघायचा तो निघतोच आहे. या कार्यक्रमात सदाभाऊंचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण गंमत म्हणजे हा कार्यक्रम संपवून मुख्यमंत्र्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी जयंत पाटील यांच्याच घराजवळ यावं लागणार आहे. कारण जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या हॅलिपॅडवरुन मुख्यमंत्र्यांचं हॅलिकॉप्टर टेक ऑफ करणार आहे. कोणताही आणि कोणत्याही पक्षाचा नेता इस्लामपूरमध्ये आला की त्याला जयंत पाटलांच्या घराजवळच्या हेलिपॅडवर यावच लागतंय. मुख्यमंत्रीही त्याला अपवाद नाहीत… त्यामुळं जयंतरावांच्या विरोधकांनी त्यांना कितीही घेरणयाचा प्रय़त्न केला तरी जयंतरावांनी अशी काही सोय केली आहे की कोणताही भाजपचा नेता इस्लामपुरमध्ये आला तरी त्याला जयंतरावांशी जवळीक साधावीच लागते…. समझनेवालोंको इशारा काही है.
COMMENTS