अहमदाबाद – गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे. त्यामुळे अशा पक्षाशी युती करणार नाही अशी भूमिका गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंग सोळंकी यांनी घेतली आहे. त्यामुळे 2012 मध्ये एकत्र लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले होते. त्यामुळे सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवार यांनी दांडी मारली होती. त्यानंतर दोन्ही पक्षातली दरी आणखी रुंदावली आहे.
गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे गुजरात प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत सन्माने युती झाली तर करु नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस गुजरातमध्ये विधानसभेच्या 50 जागा लढवेल असा इशारा दिला होता.
COMMENTS