स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारूनही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज (शनिवारी) सहारनपूरला रवाना झाले आहेत. सहारनपूरच्या शब्बीरपूर गावातील जातीय हिंसाचारात एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी सहारनपूरमध्ये तळ ठोकून आहेत. या ठिकाणची परिस्थिती पुन्हा चिघळू नये, यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने राहुल गांधी यांना परवानगी नाकारली होती.
COMMENTS