राहुल गांधीचा मोटारसायकलवरून ट्रिपलसीट प्रवास, पोलीस करणार कारवाई ?

राहुल गांधीचा मोटारसायकलवरून ट्रिपलसीट प्रवास, पोलीस करणार कारवाई ?

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील पोलीस गोळीबारात ठार झालेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शेतक-यांवर गोळीबार झालेल्या मंदसौर जिल्ह्यातील गावात जाण्यास पोलिसांनी राहुल गांधी यांना मज्जाव केला. त्यामुळे पोलिसांना चकवा देऊन ते दुचाकीवरुन त्या गावात पोहचले. मात्र दुचाकीवरुन प्रवास करताना त्यांनी नियमांचा भंग केला आहे. राहुल गांधी यांच्या समवेत त्या दुचाकीवर आणखी दोघे जण बसले होते. त्यामुळे त्या दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणे त्यांना भोवणार आहे. तसंच प्रवासाच्यावेळी त्यांनी हेल्टमेटही घातले नव्हते. या प्रकरणाचा तपास करुन कायद्याचा भंग झाला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये परवा आंदोलकर्त्या शेतक-यांवर मध्यप्रदेश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी राहुल गांधी आज तिथे गेले होते.  तिथे जाण्यापासून मज्जाव केला असतना राहुल गांधी तिथे गेल्यामुळे त्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान  गोळीबाराच्या घटनेनंतर मध्यप्रदेशात वातावरण तणापूर्ण आहे. आजही शेतक-यांनी राज्यात हिंसक आंदोलनं केली.

COMMENTS