रुग्णाने बिल भरले नाही तरी डिस्चार्ज दिलाच पाहिजे – हायकोर्ट

रुग्णाने बिल भरले नाही तरी डिस्चार्ज दिलाच पाहिजे – हायकोर्ट

एखाद्या रुग्णाने उपचार घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाचे बिल दिले नाही तर संबंधित रुग्णाला डांबून ठेऊ नये, त्याला रुग्णालयाने डिस्चार्ज दिलाच पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले.

मध्यप्रदेशमधील माजी पोलीस अधिकाऱ्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्तापर्यंत त्यांच्यावर जे उपचार करण्यात आले होते. त्याचे बिल 13 लाख 50 हजार रुपये इतके झाले. हे बिल न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने वडिलांना डिस्चार्ज न देता डांबून ठेवले असा आरोप रुग्णाच्या मुलाने केला होता. रुग्णालयात वडीलांवर योग्य उपचार होत नसल्याने त्यांना परत न्यायचे आहे असे मुलाचे म्हणणे होते.

याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली.

COMMENTS