नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. त्यानंतर आता सरकारने दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या नोटा छापायलाही सुरूवात केली आहे.
हा निर्णय नोटाबंदीची घोषणा होण्यापूर्वीच घेण्यात आला होती. लवकरच ही नोट चलनात येईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. दोनशे रुपयाची ही नोट तयार करताना सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. अशा प्रकारची बनावट नोट छापता येणार नाही, याची विशेष खबरदारी सरकारने घेतली असल्याचेही समजते.
COMMENTS