लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुळे जिल्ह्यातील गावांमध्ये जलजागृती करण्यासाठी जलसंधारणाचे महत्व पटवून देण्यासाठी बॉलिवूडचा सुपरस्टार आमिरखान आणि त्याची पत्नी किरणराव यांनी हजेरी लावली होती. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा या दोन गावात पाणी चळवळीच्या कामासाठी आमिर खान हातात फावडे,टोपले घेऊन श्रमदान केलं आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात बांध बंदिस्तीचे त्याने अर्धा तास काम केले. त्याच्या या कामात या दोन्ही गावातील ग्रामस्थही सहभागी झाले होते. चित्रपटातील शुटींगला शोभेल अशी ही दृष्ये असून पाण्याच्या संघर्षाची खरीखुरी कहाणी सांगणारे आहेत. आनंदवाडी गौर या गावात २० मिनिटे तर तगरखेडा या गावात चार तास खर्च करून श्रमदान तर केलेच, याशिवाय जलसंधारणाचे महत्वही त्याने यावेळी ग्रामस्थांना पटवून सांगितले. पाणी फाउंडेशनचा सर्वेसर्वा असलेला आमिरखानने यावेळी ग्रामस्थांकडून पाणी समस्येविषयी माहिती घेतली तसेच सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा जलसंधारणाचे कामे ग्रामस्थांनी करण्याचे आवाहन केले. सुरक्षेच्या कारणावरुन आमिर खान येणार असल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. तसेच माध्यमानाही याचा कानोसा आमिरखानच्या पाणी फाऊंडेशनने लागू दिला नाही. मात्र तरीही याठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. त्यासाठी पोलिसांचा भलामोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांतर्फे आमिर खानचा टिळा लावून, फेटा बांधून सत्कारही करण्यात आला. यावेळी तगरखेडा येथे सुपरस्टार आमिर खान आणि त्याची पत्नी किरणराव यांनी शेतात बसून खिचडीचा आनंदही घेतला. तब्बल 4 तास आमिरखान निलंगा तालुक्यातील तगरखेडा या गावात होता. यावेळी त्याने सुरु केलेल्या वाँटरकप स्पर्धेबद्दल आणि जलसंधारणाबद्दल ग्रामस्थांना काय मार्गदर्शन केलं ते एकूयात.
SPEECH : आमिरखान, बॉलिवूड सुपरस्टार
COMMENTS