लातूर एक्सप्रेस बिदर पर्यंत नेण्याला उस्मानाबादकारांचा तीव्र विरोध, आज बंदची हाक

लातूर एक्सप्रेस बिदर पर्यंत नेण्याला उस्मानाबादकारांचा तीव्र विरोध, आज बंदची हाक

उस्मानाबाद – लातूर एक्स्प्रेस बिदर पर्यंत नेण्याचा रेल्वेचा वाद आणखीच पेटला आहे. लातूरकरांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. लातूर शहर कडकडीत बंद करुन त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. त्याच्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनीही लातूर एक्सप्रेस बिदरपर्यंत नेण्याला तीव्र विरोध केला आहे. रेल्वेच्या या निर्णयाविरोधात आज लातूर आणेि उस्मानाबादमध्ये कडकडीत बंद आहे.  शहर आणि जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातू रेल्वेला जाग आली नाही तर येत्या 9 तारखेला रेलरोको करण्याचा इशाराही देण्यात आलाय.

लातूर एक्स्रप्रेस लातूरपर्यंत असतानाच अनेक दिवासांचे या गाडीचे बुकींग फूल्ल असते. बीदरपर्यत नेल्यानंतर तर गाडीचे तिकीट मिळणे मुश्किल होईल. त्यामुळे या निर्णयाला लातूर पाठोपाठ उस्मनाबादकरांनीही विरोध केला आहे. यापूर्वी लातूर एक्सप्रेस काही दिवस नांदेला नेली जात होती. त्यावेळी त्या निर्णयाला जोरादर विरोध  झाला. अखेर तो निर्णय मागे घेण्यात आला.

 

 

COMMENTS