“लोकपाल कायदा कमकुवत करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न”

“लोकपाल कायदा कमकुवत करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न”

लोकपाल कायदा कमकुवत करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. तसेच लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी 2 ऑक्टोबरला दिल्ली येथे राजघाटावर आंदोलन करण्याचे अण्णा हजारे यांनी आज शनिवारी राळेगणसिद्धीत बोलताना जाहीर केले.

यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, जनतेला सरकार दरबारी कामे मार्गी लावताना अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हात ओले करावे लागतात. सरकारी कामे पुर्ण करण्यासाठी विलंब होतो व त्यातूनच भ्रष्टाचार बोकाळतो. हे टाळण्यासाठी, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकपालाच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे, तसे झाले तर भ्रष्टाचारास आळा बसू शकेल. मात्र मोदी सरकारने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना लोकपालाच्या कक्षेतून वगळले आहे. लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आपण गेल्या  तिन वर्षांपासून पंतप्रधानांकडे सातत्याने करीत आहोत. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या कायद्यातील दुरूस्तीचे विधेयक अवघ्या तिन दिवसांत मंजुर करून घेतले जाते, हा विरोधाभास आहे.

COMMENTS