लोडशेडिंगमुळे कर्जमाफी अर्ज भरण्यात अडचणी, मुदत वाढवा – धनंजय मुंडे

लोडशेडिंगमुळे कर्जमाफी अर्ज भरण्यात अडचणी, मुदत वाढवा – धनंजय मुंडे

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून लोडशेडिंग सुरू आहे. याची कबुली खुद्द उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसंच काही कारणामुळे लोडशेडिंग असल्यामुळे सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. लोडशेडिंगचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसतोय. ग्रामिण भागात 18-18 तास लाईट नाही. त्यामुळे कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याची 15 सप्टेंबरची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS