लोडशेडिंग विरोधात सत्ताधारी भाजपनेच केले आंदोलन !

लोडशेडिंग विरोधात सत्ताधारी भाजपनेच केले आंदोलन !

अहमदनगर –  राज्यात सुरू असलेल्या लोडशेडिंग विरोधात सत्ताधारी भाजपनेच आंदोलन केले.  केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. भारनियमन मुक्त राज्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपच्या काळात विजेच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन करण्याची नामुष्की ओढावली आहे.

राज्यातील काही ठिकाणी विरोधी पक्षांनी या भारनियमनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर आता चक्क सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी भारनियमनाविरोधात आंदोलन केले. अहमदनगरमध्ये भारनियमनाविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग होता. मात्र, हे आंदोलन नसून अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची सारवासारव भाजप नेत्यांनी केली.

COMMENTS