गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काल आमदारकीचाही राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांच्यासोबत भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेही उपस्थित होते. त्यामुळे आधीच वाघेला यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हजेरीने त्यात भर पडली. वाघेला यांनी मात्र आपण भाजप किंवा कोणत्याही पक्षात जाणार नाही किंवा नवा पक्षही काढणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे मग भाजप त्यांना राज्यपालपदावर वर्णी लावणार का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे. राज्यपालपदाचीही वाघेला इन्कार करत आहेत. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS