‘वाटेल ते करा, सरकार माझे काही बिघडू शकणार नाही’  विधानसभेत बॅनर !

‘वाटेल ते करा, सरकार माझे काही बिघडू शकणार नाही’ विधानसभेत बॅनर !

मुंबई – राधेशाम मोपलवार यांच्या समृद्धी प्रकरणातील कथीत भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन आजही विरोधक आक्रमक झालेत. विधान भवन परिसरात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राशेशाम मोपलवार यांना तातडीने समृद्धीवरुन हटवा आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. ‘ वाटेल ते करा, सरकार माझे काहीही बिघडू शकणार नाही’ असे बॅनर विरोधकांनी फडकवले. या बॅनरवर राधेशाम मोपलवार यांचा फोटो होता. राधेशाम मोपलावार यांना सरकारचा आर्शिवाद आहे. त्यामुळे ते काहीही बिनधास्तपणे करत आहेत. असंच विरोधकांना त्यातून सूचवायचं आहे.

 

 

COMMENTS