मंदार लोहोकरे पंढरपूर : राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. वेधशाळेने राज्यात तापमानात वाढ होईल असे भाकीत वर्तविले आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणत होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायनी ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणत होत आहे. आत्ता पर्यंत ५.७४ टी.एम.सी इतक्या पाण्यचे बाष्पीभवन झाले असून वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असल्याची माहिती उजनी धरणाचे उपविभागीय अभियंता सुनील म्हेत्रे यांनी दिली. जागतिक तपमान वाढीचा हा फटका बसत असल्याची चिंता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
जागतिक तापमान वाढीचा फटका सर्वत्र बसत आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी जगातील संशोधक आणि अभ्यासक काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सूर्यदेव आग ओकू लागला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडा आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही शहरात तापमानाचा पारा चाळीशी पार केला आहे. त्यातून वेधशाळेने अंदाज वर्तवित तापमान वाढ होणार आसे जाहीर केले. नागरीक, पशू – प्राणी यांना याच्या झळा बसत आहेत. त्याहीपेक्षाही गंभीर बाब म्हणजे धरणातील पाणी साठ्यात मोठी घट होत आहे. तापमान वाढी मुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले आहे.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणी साठ्यात या तापमान वाढीचा फटका बसला आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी इतकी आहे. जर धरण पूर्ण भरले तर धरणातील पाणी माढा, इंदापूर, दौंड, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा या गावापर्यंत बॅक वॉटर पोहचते. तर उजनी धरणाचे बॅक वॉटर क्षेत्र जवळपास १०७ कि.मी. लांब आहे. या उजनी धरणात ६३ टीएमसी पाणी साठा हा मृत तर ५४ टीएमसी हा जिवंत पाणी साठा आहे. गेल्या तीन वर्षातील दुष्काळाच्या झळा उजनी धरणातील पाणी साठ्ला बसला होता. यंदाच्या वेळेस म्हणजेच १५ ऑक्टम्बेरला धरण ११० टक्के भरले होते. त्यानंतर कालव्याद्वारे १६.२५,नदीत ११.७४,बोगद्यात २.७४,सीना माढा उपसा ८ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आले होते.
मात्र गेल्या काही आठवड्यात वाढत्या तापमानामुळे उजनी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणत झाले. जवळपास ५.७३ टीएमसी एवढे बाष्पीभवन झाले आहे. या बाबत जलअभ्यासक अनिल पाटील यांनी वाढत्या तापमानाचा फटका आता पाणी साठ्यावर होत असून याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.धरणातील पाणी साठा हा पसरट आहे. त्यमुळे बाष्पीभवन होते. उजनी धरणाचा विचार करता या धरणातील गाळ आणि माती काढली पाहिजे.धरण जर खोल झाले तर बाष्पीभवन कमी होईल. तसेच सरकाराने या विषयी योग्य पावले उचलून तातडीने उपाय करणे गरजेचे आहे आसे मत अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
बाष्पीभवनाचे प्रमाण जरी कमी असले तरी भविष्यात हि समस्या गंभीर होऊ नये म्हणून याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.अस असले तरी “जल है तो कल है” या प्रमाणे धोरण निश्चित करावे लागणार आहे.एकीकडे जलयुक्त शिवार योजना राज्य सरकारने जशी महत्वकांक्षी म्हणून पाहात आहे. त्याच धर्तीवर आता या वाढत्या तापमानाल रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे.
COMMENTS