बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्य सम्राट विजय मल्ल्या याचा गोव्यातील आलिशान किंगफिशर व्हिला स्टेट बँकेच्या पुढाकाराने विकण्यात आला आहे. किंगफिशर व्हिला व्हायकिंग मीडिया आणि एंटरटेनमेंट या चित्रपट निर्माती कंपनीचे मालक सचिन जोशी यांनी 73.01 कोटीत विकत घेतला आहे.
मल्ल्याचा हा व्हिला विकून बँकांनी कर्जाचा एक हिस्सा वसूल केला आहे. मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्ससाठी कर्ज घेताना आपल्या ज्या मालमत्ता तारण ठेवल्या त्यात गोव्यातील या आलिशान किंगफिशर व्हिलाचा समावेश आहे.
मल्ल्याला कर्ज देणाऱ्या 17 बँका 9000 कोटींचे कर्ज वसूलीचे प्रयत्न करत आहेत. यानुसार मल्ल्याचे मुंबईतील किंगफिशर हाऊसही विकण्यात येणार आहे.
गोव्यात कंडोलिम भागात समुद्र किनाऱ्यावर असलेल्या किंगफिशर व्हिलाचा ऑक्टोबर 2016 मध्ये विकण्याचा पहिला प्रयत्न केला गेला. त्यावेळी या व्हिलाची किंमत 85.29 कोटी ठेवली होती. नंतर डिसेंबर 2016 मध्ये ही किंमत कमी करून 81 कोटी केली गेली. तरीही हा व्हिला विकला गेला नाही. गेल्या महिन्यात मार्च 2017 मध्ये या व्हीलाची किंमत पुन्हा कमी करून 73 कोटी करण्यात आली.
COMMENTS