विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांची निवड झाली आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज अनिल परब यांच्या नावाची घोषणा केली.
विधानपरिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळापासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रिमंडळात असल्याने त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. म्हणून अनिल परब यांना विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, तसेच काही दिवसापासून शिवसेनेमध्ये खांदेपालट होणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. काल (गुरुवारी) शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्याची उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती बैठक पार पडली, या बैठकीत आमदारांनी शिवसेना मंत्र्यावरील नाराजी व्यक्त केली होती. मात्र खांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी घेऊ, असे उद्धव ठाकरेंनी बैठकीत स्पष्ट केले होते. अखेर आज एक खांदेपालट करण्यात आली.
COMMENTS