विधानसभेत “त्या” रणरागिणींच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर !

विधानसभेत “त्या” रणरागिणींच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर !

मुंबई – महिला क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव आज विधानसभेत एकमतानं मंजुर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील तीन महिला क्रिकेटपटूंना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबईची पूनम राऊत, सांगलीची स्मृती मानधना आणि विदर्भातील मोना मेश्राम या महिलांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली.

COMMENTS