मुंबई – विधान परिषदेचं कामकाज आज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदारांना सुरक्षेबाबत काही सूचना केल्या. उत्तर प्रदेश विधिमंडळमधील स्फोटक सापडल्याची सुरक्षा भेदल्याची घटनेची आठवण करत त्यांना आमदारांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केले. अनेक आमदार विधिमंडळात प्रवेश करताना त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या गाड्यांसह आतमध्ये येतात. त्यांची तपासणी न करता सोडव्यात अशी आमदारांची मागणी असते. मात्र सुरक्षच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. त्यामुळे आपण याची काळजी घ्यावी आणि सुरक्षा रक्षकांना सहकार्य करावे असंही सभापती म्हणाले. लॉबीमध्येही अनेक कार्यकर्ते येतात त्यावरही आमदारांनी लक्ष ठेवावे असं आवाहनंही रामराजे निंबाळकर यांनी आमदारांना केलं.
COMMENTS