विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबई – लेखक विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सीईओ असताना, विश्वास पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीने दोन विकासकांना मदत केल्याचा आरोप आहे. विश्वास पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मदत केली, अशी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. विश्वास पाटील हे एसआरएच्या सीईओपदावर असताना त्यांनी दोन विकासकांना नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

रामजी शहा आणि रशेस कनकिया या दोन विकासकांच्या मालाडमधील प्रकल्पांना पाटील यांनी नियम मोडून अधिकारांचा दुरुपयोग करत मदत केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेत विश्वास पाटील त्यांच्या पत्नी चंद्रसेना तसेच दोन विकासकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, विश्वास पाटील यांनी निवृत्त होण्यापूर्वी शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात फायल्सवर स्वाक्षरी केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. झोपु योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर विश्वास पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत

 

 

COMMENTS