केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळाली आहे. पक्षीय बलाबल पहाता त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. व्यंकय्या नायडू हे भाजपच्या संसदीय मंडळात होते. पक्षाचे सर्व महत्वाचे निर्णय घेणारी ही समिती असून नायडूंच्या उपराष्ट्रपतीच्या उमेदवारीमुळे संसदीय समितीमध्ये एक जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संसदीय समितीमध्ये 12 सदस्य असून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, सुषमा स्वराज आदी नेते या समितीमध्ये आहे. फडणवीसांची या जागेवर नियुक्ती झाल्यानंतर या समितीमध्ये मुख्यमंत्री असेलले शिवराजसिंह यांच्यानंतरचे ते दुसरे नेते असतील. मोदी आणि अमित शहा यांच्या गुडबूकमध्ये फडणवीस आहेत. त्यामुळेच त्यांची या जागेवर वर्णी लागेल असं बोललं जातंय.
COMMENTS